पुस्तक कींवा वाचन हे असं साधन आहे की जे आपल्या वैचारिक प्रगती मध्ये फार मोलाच योगदान देते. आज वाटलं कि ह्यावर काहीतरी लिहावा म्हणून आज प्रयत्न करतो..
खरं म्हणजे वाचन हा आपल्या आयुष्यात अगदी आपल्या जन्मापासून येते, म्हणजे बघाना आपला जन्म होतो तेव्हा आपण इवलुश्याडोळ्यांनी आजुबजुची माणसं बघायचा प्रयत्न करतो, स्पर्शाने माणसं ओळखायचा प्रयत्न करतो हे सुद्धा वाचनच आहे एक प्रकारचं, पणनेहमी प्रमाणे आपल्याला शिकवतात कि पुस्तक, वर्तमानपत्र कींवा साहित्य म्हणजे वाचन त्यामुळे काय होते की आपण त्या गोष्टीचाआवडीनुसार वापर करतो.
पुस्तक वाचन हा प्रकार खरं म्हणजे आभ्यास म्हणून आपण सुरुवात करतो आणि आपलं बालपण फक्त त्यातच जाते, आपणअवांतर वाचन केव्हा करतो जेव्हा आपण वाचनाची आवड असलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात येतो. माझं देखील असंच झालं मला देखीलइतर मुलांसारखी वाचनाची तशी आवड नव्हती कधी, पण एकदा ऑफिस मधल्या बॉस ने एक पुस्तक वाचायला दिला आणि मला तेपुस्तक एवढं आवडलं कि त्यानंतर माझं मन त्यामध्ये रमायला लागलं. खरं म्हणजे वाचनामुळे प्रोफेशनली माझ्यात बराच बदल झाला. माझ्या बॉस ने मला एक वाक्य सांगितलं होतो कि "शिकून वाचनात रस नसलेला व्यक्ती हा वाचता न येणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त निरक्षर असतो", आणि मला ते खऱ्या अर्थाने पटलं होत.
मित्रांनो वाचन खूप महत्वाचं आहे मग तुम्ही पुस्तक वाचा, इंटरनेटवर एखादा इंटरेस्टिंग टॉपिक वाचा कींवा वर्तमानपत्र वाचा. जे काहीवाचाल त्यातून तुम्हाला काही तरी नवीन शिकायला नक्की मिळेल, वर्तमान पत्राचं उदाहरण घेतलं तर शेवटच्या पानावरील क्रीडाविश्वातील बातम्या तुम्हाला कुठल्या तरी खेळाची आवड निर्माण करतील, कींवा विविध खेळा विषयी तुम्हाला ज्ञान मिळेल ज्याचातुम्हाला कधी ना कधी फायदा होईल, आजकालची लहान मुलं कधी काही प्रश्न विचारतील ह्याचा नेम नाही त्यामुळे स्वतःला ह्या अशाअवांतर वाचनातून अपग्रेड करत राहायचा.
प्रत्येक पूस्तक आपल्याला काही तरी शिकवते, जस मी जेव्हा who move my cheese हे पुस्तक वाचलं जे मी वाचलेलं पाहिलंइंग्रजी पुस्तक होत त्याने माझ्या प्रोफेशनल आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि मला बढती मिळाली. त्या पुस्तकाने मला हेशिकवलं की नेहमी एकाच कामात अडकून नका ठेवू स्वतःला नेहमी कामामध्ये विविधता आणा जेणेकरून डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटीयेईल आणि नवीन काही तरी कल्पना सुचतील. पुस्तक वाचताना तुमचे डोळे आणि आत्मा जो पर्यंत एकत्र येत नाही तो पर्यंत तुम्हीपुस्तक वाचत नाही, कारण हे जर नसेल तर तुम्ही फक्त पुस्तक चाळता वाचत नाही. पुस्तक कधी वाचू नका तर ते समजून वाचाजेणेकरून त्याचा अर्थ अभिप्रेत होईल. मी मराठी शाळेतून शिकलो आहे त्यामुळे आम्हाला एक प्रश्न नेहमी यायचा परीक्षेत तो म्हणजेसंदर्भासहित स्पष्टीकरण द्या ह्याचा अर्थ काय तर एक पूर्ण पॅराग्राफ आपल्या भाषेत समजावून सांगायचं, त्यावेळी वाचनाची आवडनव्हती त्यामुळे उत्तर पाठ करून जायचो पण आज जेव्हा वाचनाची आवड आहे तेव्हा असे वाटते की आता तो प्रश्न आला तर पैकीच्यापैकी मार्क मिळतील.
मित्रांनो आजची शोकांतिका हीच आहे कि फार कमी वाचन करतात मुलं त्यामुळे काय होते आहे की विचाराने फार मागे राहतातआणि फास्ट life च्या मागे जातात. माझी विनंती आहे प्रत्येक पालकाला कि तुम्ही तुमच्या मुलांना वाचनाची ओढ लावा आतापासूनचआणि बघा त्यांची प्रगती कशी होते ते, बरं कुठलेही त्यांना आवड असेल त्या विषयाची पुस्तक आणून द्या जेणेकरून वाचनाची आवडनिर्माण होईल त्यांच्यात. तुम्ही वाचाल तर तुमचं भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवलं, नवीन शब्द कानावर पडले की आपली शब्दाची पिशवीछान भरते.
मित्रांनो मला वाटलं वाचनाची आवड जोपासली तर काही तरी बदल माणसामध्ये नक्की होतो आणि मी हे स्वतः अनुभवले आहेम्हणून आजच्या पिढीसाठी share करतोय. बघा तुम्हाला पटतंय का आणि पटलं तर पूढे पाठवा आणि जनजागृती करा. धन्यवाद
-स्वप्निल पातकर 27062021
No comments:
Post a Comment