Saturday, October 16, 2021

समजूतदारपणा

    आज मोबाईलवर काही तरी चाळत असताना एक मोटिवेशनल वाक्य कानावर पडलं ते म्हणजे "समोरच्याला आपण त्याच्यासाठी कोण आहोत हे जर नाही समजलं तर फार मोठी गल्लतहोते"

  मला हे वाक्य आजच्या युगात खूप relate झालं कारण आपण एखाद्या बरोबर हसतोमस्ती करतो त्याच्यासाठी पाहिजे तेव्हा वेळकाढतो पण ती व्यक्ती आपण आणि दुसरा ह्यामध्ये जेव्हा निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती व्यक्ती दुसऱ्याला निवडून निघून जातेम्हणजे आपल्याला कोणी तरी गृहीत धरते आहे हे आपल्याला जर नाही कळलं तर फार मोठा प्रॉब्लेम होतो आणि मग आपण त्यागोष्टीचा विचार करत बसतो आणि स्वतःच आयुष्य हरवून बसतोमित्रांनो कोणी किती जवळ का असूदेतकिंवा तुम्ही त्या व्यक्तीसाठीकितीही काहीही करा पण त्या व्यक्तीची सवय नका करून घेऊआणि विशेष म्हणजे समोरचा पण तोच विचार करतोय का जो तुम्हीविचार करताय हे वेळोवेळी समजून घ्यायचा प्रयत्न करामाणसं तुमचा उपयोग करून घेतात आणि तुम्हाला depression मध्ये सोडूनजातातह्या situation मध्ये यायच्या आधी समोरच्याला आपण कोण आहोत ह्याची खातरजमा करून स्वतः भवती एक लक्ष्मणरेषाआखून घ्या.

  -स्वप्निल पातकर @miswapnilpatkar

No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...