Sunday, August 15, 2021

स्वातंत्र्यदिन विशेष

    75 व्या स्वतंत्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे स्वातंत्र्यदिनाचं महत्व खूप मोठं आहे पण आपण ते एक सार्वजनिक सुट्टीम्हणून समजून कमी केलाय.

   आपला देश 1947 ला स्वतंत्र जरूर झालाय पण अजूनही आपल्याकडे जातीभेद, आरक्षण, निरक्षरता, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांनाअजूनही पुरुषानं इतकेच सगळीकडे महत्व प्राप्त झाले नाही अशा अनेक समस्या जशाच्या तशा आहेत. आपला देश ह्या सगळ्यांमधूनजो पर्यंत स्वतंत्र होत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने आपण देश स्वतंत्र झाला असा म्हणता येणार नाही. कुरघोडीच्या पॉलिटिक्सच्याविळख्यातून जेवढ्या लवकर देश स्वतंत्र होईल तेवढ्या लवकर देशाचा विकास होईल. गावा  गावात प्रगत शिक्षण आणि खेळाविषयीमहत्व जो पर्यंत पोहचत नाहो तो पर्यंत आपला देश काही स्वतंत्र झाला असा वाटत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या, सावकारांची अरेरावी, राजकारण्यांची शिक्षणसंस्था तसेच मोठ्या आर्थिक पेढीवर असलेली मक्तेदारी जो पर्यंत जात नाही तो पर्यंत आपला भारत देश स्वतंत्रझाल्यासारखा वाटणार नाही.

     असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत जे आपण स्वतःहून पुढाकार घेऊन सोडवले पाहिजेत, आज आपण फक्त जागेवर बसून दुसर्यानेकाय तरी करावं अशी अपॆक्षा करतोय. जो पर्यन्त हि मानसिकता कमी होत नाही तो पर्यंत भारत देश स्वतंत्र झालाय असं वाटणार नाही. तर मित्रांनो हि अशी खंत वर्षानु वर्ष चालूच राहणार आहे असं वाटते त्यामुळे प्रत्येकाने काही तरी  वसा घेऊन वर्षाला एक तरी सामाजिककार्य करावा जेणेकरून एखाद्याच्या प्रगतीला हातभार लागेल. बाकी हे माझा वयक्तिक मत आहे त्यामुळे पटलं तर आत्मसात करा आणिदेशाच्या विकासात भाग घ्या. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! भारत माता की जय!!!

Monday, August 2, 2021

मैदानी खेळ प्रबोधनाची गरज

     आज मी महिलांची हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपालची biography वाचत होतो आणि कसं एका cycle ओढून दिवसाला 80 रुपयेकमावणाऱ्या वडिलांनी मुलीला हॉकी खेळण्यासाठी मदत केली हे वाचून थक्क झालो. अर्थात सगळेच नॉनक्रिकेट प्लेयरची अशीचकाही तरी गाथा आहे म्हणजे घरात काही नसताना त्यांनी खेळासाठी सर्वस्व पणाला लावून देशाचं नाव मोठ केलंय, तुम्ही बघाना पि. टी. उषा, अंजु जॉर्जे, मेरी कोम, गीता फोगट हि काही मला माहिती असलेली नाव ज्यांनी घरची परिस्थिती खराब असताना पण खेळामध्येनाव कमावलं आणि देशाचं नाव उंचावलं.

   आज जर आपण आजूबाजूला बघितलं तर असे किती तरी पालक बघाल ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली असते तरी देखीलते आपल्या मुलांना खेळात प्रोत्साहन देण्यापेक्षा CBSE, ICSE बोर्ड मध्ये शिक्षण देण्यासाठी शेजारच्या मुलाबरोबर compete करतात. 

मला आठवते मी जेव्हा मुंबईच्या ओव्हल ग्राउंड, आझाद मैदान वरून जायचो तेव्हा फक्त क्रिकेट प्रॅक्टिस करणारी मुलं दिसायची, पणफुटबॉल च्या ग्राउंड वर  हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं दिसायची, हॉकी कुठे दिसलं नाही, इव्हन टेनिस कोर्ट वरशुकशुकाट असायचा. हे सगळं बघून पालकांच्या मानसिकता लक्षात येते कि जिथे पटकन फेमस होता येते अशा खेळात मुलांनाप्रोत्साहित करतात, आज हॉकी मध्ये बोला, टेनिस मध्ये बोला, बॉक्सिंग बोला, athelitics बोला तुम्हाला फक्त कुठून तरी छोट्याकुटुंबातील आलेली खेळाडूच दिसेल पण  आपल्यासारख्या प्रगत राज्यातील मुलं मुली दिसणार नाही. 

   आपल्या शाळेत जेवढे मैदानी खेळ खेळले जायचे किंवा आजही जे खेळले जातात ते सरकारने सगळ्या शाळांना मग त्या CBSE, ICSE माध्यम असो त्यांना अनिवार्य (compulsary) करायला पाहिजे, तसेच ह्या शाळांना सुद्धा असे खेळ स्टेट, नॅशनल लेवल मध्येखेळायला विध्यार्थाना प्रोत्साहित करायला पाहिजे. आणि एक गोष्ट आता प्रत्येक शाळा जे parents मीटिंग ठेवतात त्यातविध्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रगती discuss करतात तेवढेच महत्व पालकांना मुलांना खेळात सुद्धा प्रगती करावी ह्यासाठी प्रबोधनकरायला पाहिजे. प्रभोधनाशिवाय प्रगती नाही आणि ही नीती जर शाळांनी नाही अंगिकारली तर आपली मुलं फक्त online खेळातपारंगत होतील आणि त्या खेळाला आपण जास्त महत्व देऊ शकत नाही.

    कृपया सर्वांनी मैदानी खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करूयात जेणेकरून खेळ हा प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात compulsary विषय बनला पाहिजे आणि त्यात पण पास आणि नापास असे निकष असायला हवे तरच मुलांना ह्या मैदानी खेळात रस निर्माण होईलआणि ह्यातून राष्ट्राला किती तरी चांगले खेळाडू मिळतील आणि आपण पण आपल्या देशाला पदक पालिकेत अग्रस्थानी बघुयात.

    मित्रांनो आपल्यात पण काही शिक्षक मित्र मैत्रिणी आहेत /असतील यांनी हा विषय लावून धरा तुमच्या लेवल वर जेणेकरून हे कुठेतरी ऐकलं जाईल आणि त्याची मदत मुलांना होईल आणि त्यांचे पालक प्रेरित होऊन खेळाला प्रोत्साहित करतील. धन्यवाद!!!

  • स्वप्निल पातकर 02082021

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...