Friday, July 23, 2021

गुरुपौर्णिमा

      आज गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जडणघडणीत ज्यांच योगदान आहे अशा सर्व गुरूंना नमन करण्याचा दिवसआपण सगळेचलहानपणापासून ते आतापर्यंत काही ना काही शिकत असतोतसेच आपल्या ह्या प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतातज्यांच्यामुळे आपण काही तरी नवीन शिकत असतो आणि मला वाटते ते आपले गुरूच असतात.

     शिकण्यासाठी असं काही वय वैगरे नसते आणि शिकणं कधीच थांबत नाही अगदी उतार वयात सुद्धा अशी काही मंडळी आहेत जेकाही तरी नवीन शिकतात आणि तरुणांना लाजवतातमाझं स्वतःचा सांगितलं  तर मी आज जे काही शिकलोय मग ते संस्कार असोकींवा अवांतर छंद असो त्याची आवड मला शाळेतल्या शिक्षकांनी लावलीम्हणजे अभ्यास व्यतिरिक्त देखील इतर गोष्टी जसे की खेळवक्तृत्व स्पर्धाकला स्पर्धा ह्यात भाग घ्यायला नेहमी प्रोत्साहन दिलंआज त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे मी सगळ्या गोष्टींना सहजसामोरे जातो आणि मी तीच वृत्ती माझ्या मुली मध्ये पण आणायचा प्रयत्न करतोयआज त्या गुरूंना माझा नमस्कार ज्यांनी मला ह्यालायक बनवलं.

    आज प्रोफेशनल करियर मध्ये देखील मला खूप गुरु भेटले ज्यांनी माझ प्रोफेशनल नॉलेज पॉलिश केलं आणि माझ्या प्रगती मध्येमोलाचा वाटा उचलला त्यांना देखील माझा वाकून प्रणामअनेक मित्र देखील भेटले ज्यांच्या सहवासात राहून ट्रेकिंगची आवड निर्माणझालीतसेच फोटोग्राफी ची आवड निर्माण झाली आणि हे छंद मी आजपण जोपासतो आहे म्हणून त्यांना पण माझा प्रणाममित्रांनोतुम्ही नसते तर आयुष्य खूप निरस झालं असतं.

   आपल्या आयुष्यात अशी पण काही लोक येतात ज्यांच्यामुळे आपण काही तरी धडा शिकतोकाही व्यक्ती नकारत्मकता घेऊन येतातज्याने कधी कधी बरीच लोक डिप्रेशन मध्ये देखील जातात पण माझा एकाच सल्ला आहे कि आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकारआहोत म्हणून दुसर्यांमुळे आपण डिप्रेशन नाही घेत तर स्वतःमुळे घेतोआपण ह्या व्यक्तींपासून संकटात कसे उभे राहायचे हे शिकायचेआणि त्यांना थँक यु बोलायचं हे शिकवल्यामुळे.

    आज गुरुपौर्णिमा जो आजचा खूप सुंदर दिवस आहे त्या निमित्ताने मी सर्व गुरूंना नमस्कार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणिअसाच आशीर्वाद राहू दे माझ्यावर हि विनंती करतो.

-स्वप्निल पातकर 23072021

No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...