Wednesday, May 26, 2021

आदर (Respect)

      बरेच दिवस झाले एक विषय डोक्यात घोळत होता पण वेळे अभावी लिहू नव्हतो शकत, आज वेळ काढून मी तो लिहितोय आणि तो विषय आहे आदर (Respect) जो आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो आपल्या दैनंदिन जीवनात.

       हा आदर नावाचा शब्द खूप नाजूक आहे म्हणजे कधी मनापासून मिळतो नाही तर कधी तरी तो नाईलाजाने द्यावा लागतो. आता ह्या आदर नावाच्या शब्दाची एक गम्मत मी तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफिस मध्ये एक सहकारी होता जुनिअर मॅनेजर म्हणून होता आणि त्याच्या हाताखाली काही हेल्पर इंजिनियर होते, आमच्या दोघांचे टेबल बाजूबाजूला होते आणि त्यामुळे त्याच्या टेबल वर होणारे संभाषण मला ऐकायला यायचे. आता हा सहकारी नवीनच जॉईन झाला होता आणि जे इंजिनियर होते ते बऱ्याच वर्षांपासून आमच्याकडे काम करत होते, आता त्यातले काही इंजिनियर त्याला सर बोलत नव्हते तर त्याच्या नावाने त्याला हाक मारायचे आणि ते त्याला आवडत नव्हते, एकदा त्याने सगळ्यांना -मेल टाकला कि मला सर बोला आणि रिस्पेक्ट द्या वैगरे असा उपदेशाचे डोस दिले त्यात, तरी काही जण नाही सुधारले आणि त्याला नावाने  हाक मारायला लागले, शेवटी एक दिवस त्याचा तोल गेला आणि त्याने चिडचिड करत त्या इंजिनियरची कानउघाडणी केली कि मला सर बोलायचं नावाने हाक नाही मारायची

     मी हा सगळं प्रकार बघत होतो आणि मी सिनियर होतो त्याचा त्यामुळे मला काही लपून नव्हता राहिल. एक दिवस असाच फ्री वेळ होता आणि मी त्याला मीटिंग रूम मध्ये बोलावलं आणि त्याच्याशी ह्या विषयावर बोललो, त्याला मी शांतपणे सांगितलं कि समोरचा तुला सर बोलत नाही ह्याचा अर्थ तुला ते रिस्पेक्ट देत नाही असा होत नाही ना, तु देखील आम्हाला सर बोलत नाहीस म्हणून काय तू आमचा रिस्पेक्ट करत नाहीस असा होत नाही ना, एक गोष्ट लक्षात ठेव नेहमी "रिस्पेक्ट कधी मागायचा नसतो तर तो कमवायचा असतो" तू आताच नवीन आला आहेस तर तुझ्या टीम साठी काही तरी कर, त्यांच्यात मिसळ, त्यांच कामाचं culture समजून घे, त्यांना मार्गदर्शन कर मग बघ कसा रिस्पेक्ट मिळतो ते, हे सगळं केल्यावर एका इंजिनियर ने जरी तुला थँक्यू बोलला ना तरी तो एक प्रकारचा रिस्पेक्ट आहे. त्याला हे पटलं आणि त्याने त्याप्रमाणे काम करायचा ठरवलं आणि त्याला अपेक्षित रिस्पेक्ट मिळायला लागला.

      मित्रांनो आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या ठिकाणी काम करत असतो मग कोणी इंजिनियर असो, डॉक्टर असो, कोणी शिक्षक असो की कोणी housewife असो हा रिस्पेक्ट आपण आपल्या क्षेत्रात  कोणाकडून तरी घेतो कींवा कोणाला देतो तरी. खरं म्हणजे आदर मिळणे  कींवा आदर करणे हा एक संस्काराचा भाग आहे, आपण ज्या पद्धतीने वागतो, बोलतो कींवा कृती करतो त्या प्रमाणे आपल्याला आदर मिळतो, म्हणतात ना “First impression is last impression” हेच महत्वाचा आहे, आपला संस्काराचा पाया कमकुवत असेल ना तर आदर नावाच्या शब्दाचा अर्थ नाही कळणार कधी, शाळेत असताना समोरून चालत येणारे आपले प्राध्यापक दिसले म्हणून आपण वाट बदलायचो ते आदरयुक्त भीतीने ते जर आपल्याला लहान असताना नसतं जमलं तर आज आपण आदर नसतो शिकलो, शाळेत विद्यार्थांना शिक्षक कसे शिकवतात कींवा कामाच्या ठिकाणी आपण आपल्या सहकार्यांना कसे वागवतो ह्याने आपल्याला आदर मिळतो.

     सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आदर मिळायला लागला समाजात तर तो तुम्हाला टिकवावा सुद्धा लागतो, आदर मिळतोय म्हणून हवेत उडणारे तोच   आदर एक क्षणात गमावून बसतात, आणि आपण बरेच असे नट, नटी किंवा राजकीय व्यक्ती बघितल्या आहेत जे आज आदर गमावून बसले आहेत, तर मित्रांनो तुम्ही कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर ठेवा आणि हीच शिकवण आपल्या येणाऱ्या पिढीला पण द्या कारण पाया मजबूत तर इमारत मजबूत. उद्याचा भारत घडवायचा असेल तर ह्या छोट्या शब्दाचा अर्थ समजावून घेणे आणि समजावून देणे खूप गरजेचे आहे.

     मित्रांनो मी आदर ह्या शब्दाचा अर्थ माझ्या पद्धतीने लावायचा प्रयत्न केलाय, पटलं तर अवश्य comment करा ब्लॉग वर आणि तुम्ही share सुद्धा करू शकता. बाकी प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र आहे म्हणून पटलं तर घ्या नाही तर वाचून पुढे चला.

  • स्वप्निल पातकर @miswapnilpatkar

No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...