मित्रांनो आज मराठी भाषा दिन आहे, हा दिवस म्हणजे फक्त शुभेच्छा देऊन कींवा मराठी गाणी लावून साजरा करण्याचा दिवस नाही. तर मराठी भाषा जी आज मागे पडली आहे तिला पूढे घेऊन कसं जात येईल तो प्रयत्न करण्याचा खरा दिवस आहे.
मराठी भाषा जिने आपल्याला चालायला, बोलायला आणि भावनिक बनायला शिकवलं. जेवढं आपल्या आई वडील आणि गुरुजनांनीआपल्याला घडवलं तेवढंच मराठी भाषेने सुद्धा आपल्याला मार्ग दाखवला आहे.
लहान मूल जन्माला आलं कि पहिला शब्द शिकतो तो म्हणजे आई, आपल्या जीवनाची सुरुवात ह्या सुंदर मराठी शब्दाने होते आणिमग जसजसे आपण शाळेत जातो तसे आपल्याला अनेक मराठी शब्द शिकवले जातात, आजही मराठी वादविवाद स्पर्धा शाळेत होतातत्यासारखी दुसरी स्पर्धा नाही, कॉलेज मध्ये गेल्यावर कोणाला इंप्रेस करायचं असेल तर मराठी कविते शिवाय पर्याय नसतो 😊 कारणत्यात जेवढी भावना शुद्ध असते ती तुम्हाला इंग्रजी मध्ये नाही मिळणार. आजही अत्रे, पु.ल ह्यांचं साहित्य म्हणजे मराठी भाषिकांनापर्वणी आहे. लता दीदींचा आवाज, ग.दि. माडगूळकर, कुसुमाग्रज ह्यांचे कवितेतले शब्द, खळे काका, हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीतम्हणजे मराठी गाण्याची कट्यार असायची जी सरळ हृदयाला भिडते.
आज आपल्या महाराष्ट्रात सगळं असताना पण आपण आपली पूढची पिढी इंग्रजी शाळेत पाठवतो, मला हे कळत नाही की इंग्रजीशाळेत घालून ह्या मुलांना कला, क्रीडा आणि भाषेचं वैभव काय असत हे समजणार आहे का? मराठी कवितेचा साज ह्यांना समजणारआहे का? विनोदाने समाज प्रबोधन करणारे पु. ल. ह्यांना समजणार आहेत का?
मराठी भाषा टिकलीच पाहिजे आणि ती टिकवायची असेल तर सुरुवात आपल्या पासून करा, इंग्रजी माध्यमातून जरी मुलं शिकतअसली तरी मराठी आवर्जून शिकवा तिकडे तडजोड नका करू, मराठी भाषा हि मराठी दिनापर्यंत मर्यादित नका ठेवू, मराठी भाषा हिदेवाने दिलेली देणगी आहे त्याचं जातं करा.
आपण मराठी भाषेला कधी खाली पडू देणार नाही ह्याचा मला दृढ विश्वास आहे. शेवटी कितीही केली तरी मराठी भाषा हि आपलीआई आहे त्यामुळे कोणी तिला परके करणार नाही हि आशा करतो.
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
-स्वप्निल पातकर 27/02/2023
No comments:
Post a Comment