Sunday, May 9, 2021

मातृदिन (Mothers Day)

 आई म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात जन्मदाती म्हणून जेवढी तिची ओळख त्याहीपेक्षा संस्काराची एक शाळा म्हणून तिला जास्त महत्वमुलाला जन्म दिल्यावर आईचं हसू जगात कुठे शोधून नाही सापडणार शाळेतला पहिला दिवस असो कींवा दहावीच्या परीक्षेचा पहिला दिवस असो आईचं ऑल द बेस्ट confidence वाढवणारं असतं मुलांमध्ये नेहमी रमणारी आणि मुलांसाठी झटणारी अशी फक्त आईच असतेवडिलांच्या धपाट्या पासून मुलांना वाचवणारी आई आणि मुलाने चूक केली म्हणून धपाटे देणारी आई सुद्धा एकच असतेअशी हि आई हिच्यावर काय लिहायचं आपण जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे शेवटी आई ज्याच्याजवळ असते तो श्रीमंत असतो पण फार कमी जणांना ती श्रीमंती फळतेज्याच्याजवळ आई नसते तो मात्र तिच्या आठवणींच्या नगरीत अफाट श्रीमंत असतोअशा ह्या तमाम मातांना आजच काय पण रोज माझा साष्टांग नमस्कार. मित्रांनो आईवर प्रेम करा आणि तिला आनंदी ठेवा.मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

- स्वप्निल पातकर 09052021

No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...