मित्रांनो आज काही तरी लिहावं असं वाटलं आणि विषय डोक्यात आला तो म्हणजे नातं (relation).
आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच व्यक्तींना भेटतो मग त्या आपल्याच कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा सहप्रवासी असो की तोंडओळख असलेली व्यक्ती असो, त्यातल्याच काही व्यक्तींशी आपला नातं जुळत त्याला मग आपण मैत्रीचं नातं म्हणूया कींवा आपुलकीचा नातं म्हणूया.
प्रत्येक नातं वेगळं असतं मग ते मैत्रीचं नातं असो, प्रेमाचं नातं असो कींवा रक्ताचं नातं असो ह्या प्रत्येक नात्याचा गोडवा वेगळा असतो. प्रत्येक नातं हे खास असतं म्हणजे आई आणि मुलगी ह्यामधील मैत्री वजा प्रेम कुठेच बघायला मिळणार नाही, मुलगी आणि वडील ह्यातला प्रेम वजा respect तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही तसंच बहीण भावांमधली प्रेमळ भांडण आणि दोन दिवस अबोला कुठे बघायला नाही मिळणार. तसेच काही गोष्टी मैत्रीच्या नात्यामध्ये देखील असतात म्हणजे मैत्रीमधली असलेली विश्वास वजा प्रेम तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार, बरं विश्वास वजा प्रेम म्हणजे काय तर आपण आपले secrets फक्त मित्रालाच किंवा मैत्रिणीलाच सांगतो आणि तो मित्र किंवा ती मैत्रीण पण फक्त ते त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवतात ह्याला म्हणतात विश्वास तर मित्र कींवा मैत्रिणीसाठी काहीही आणि कसही करून मदत करणे आणि त्या मैत्रीसाठी जगाशी भांडणे ह्याला म्हणतात मैत्रिप्रेम. तसच काहीसं मुलगा आणि वडिलांच्या नात्यात असतं म्हणजे दोघांमध्ये मैत्री जरी असली तरी मुलगा वडिलांना घाबरतोच आणि ते पण फार कमी बघायला मिळेल दुसऱ्या नात्यात. मला वाटते आणि जे मला सगळ्यांच्या घरात बघायला मिळते ते म्हणजे आजी आणि नातवाचं नातं त्यात फक्त प्रेम असते बाकी काही अपेक्षा नसतात आणि असं निस्वार्थी नातं कुठेच बघायला नाही मिळणार, आजही आजीकडे जायचंय असं म्हणाल्यावर लहान मुलं फार आनंदित होतात.
बरीचशी लोकं अशी असतात त्यांना नात्याचा सहवास मिळत नाही अशी माणसं तुम्ही जर बघितली असतील तर ती थोडीशी कोडगी किंवा एका स्वभावाची असतात, तसेच ज्यांना विविध नात्याचा सहवास मिळाला असेल अशी माणसं तुम्हाला अष्टपैलू गुणांची दिसतील म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल.
वर्षानुवर्ष जेव्हा एका नात्यामध्ये आनंद, मस्ती, मजा असा प्रवास चालू असेल आणि अचानक तुम्हाला ती मजा मस्ती आणि आनंद जराही नाही जाणवला तर समजून जायचा कि गैरसमज नावाच्या तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या नात्यात प्रवेश केला आहे. आता ह्या तिसऱ्या व्यक्तीचा तुम्ही कसा सामना करता ह्यावर प्रत्येक नातं टिकतं. कोणीच कोणाच नातं तोडायला येत नाही, हे आपलं मन असत जे चुकीचा विचार करून गैरसमजाला तुमच्या मनाचा ताबा घेऊन तुम्हाला वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात आणि तुम्ही मग त्याला बळी पडता, ego आणि अविचार ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही नात्यामध्ये आली कि नातं कधीच टिकत नाही. तुमची वाणी आणि तुमचं मन ह्यावर जर तुम्ही ताबा ठेवला कि सगळी नाती व्यवस्थित टिकतात, आठवून बघा 10 पैकी 8 नाती ह्याच कारणाने तुटतात, जिभेवर ताबा नाही म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला काही बोलून जातो जेणेकरून समोरची व्यक्ती दुखावुन लांब होते, तसेच मनावर ताबा नसतो म्हणून समोरचा माणूस सुरवातीला चांगला दिसतो पण कालांतराने त्याच समोरच्या माणसाचे वाईट गुण आपल्याला दिसतात आणि मग आपण त्या माणसापासून लांब होतो. बरं जी नाती घट्ट असतात ना ती सहसा तुटत नाही अगदी तुम्ही बोलायचं बंद केलंत कींवा तुमच्या mobile मधून कॉन्टॅक्ट जरी delete केलात त्या व्यक्तीचा तरी ती व्यक्ती मनात कायम घर करून राहते.
तर मित्रानो नाती टिकवायची असतील तर मन प्रसन्न ठेवा, डोक्यात अविचार आणू नका, जिभेवर ताबा ठेवा आणि ऐकून घेण्याची क्षमता वाढवा आणि मग react करा म्हणजे गैरसमज होणार नाही. जेवढी listening पॉवर जास्त तेवढे गैरसमज कमी हा एक साधा नियम आहे आणि आपण नेमकी तेच विसरतो.
मी नात्याचा आदर करायचा शिकतोय आणि मी वाणी तसंच मनावर पण ताबा ठेवायचं शिकतोय जेणेकरून मी कोणाला दुखवू नये कधी, ह्या जगात आपण भले रडून जन्म घेतलाय पण हसत निरोप घ्यायचा हेच उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवायचा आणि तसं वागायचं, बघूया कितपत जमत ते.
तर मित्रानो आपलं नेहमीचच मी काय लेखक नाही कि फिलॉसॉफर नाही, मला जे पटलं ते मी लिहिलं, तुम्हाला पटलं तर घ्या आणि पुढे पाठवा आणि नाही पटलं तर सोडून द्या कारण सगळ्यांनाच व्यक्ती स्वातंत्र्य आहे जगण्याचं
.
-स्वप्निल पातकर (20/09/2020)
No comments:
Post a Comment