बरेच दिवस झाले विषय शोधत होतो कि कशावर लिहावं, शेवटी आज सकाळी एक विषय सापडला आणि तो म्हणजे "व्यक्तिमत्व" इंग्लिश मध्ये त्याला personality म्हणतात.
खरं सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांना personality ह्या शब्दाचा अर्थ नाही कळत, बऱ्याचदा त्यांना चांगले कपडे घातलेली व्यक्ती आणि पिळदार शरीर, खूप श्रीमंती म्हणजे चांगले व्यकितमत्व असं वाटते. पण तस नाहीये, चांगले व्यक्तिमत्व हे त्या व्यक्तीच्या चांगल्या विचारांनी ओळखले जाते, चांगले विचार असणारी व्यक्ती तुम्हाला नेहमी आकर्षून घेईल. उदाहरण द्यायचा झाले तर करोडीची संपत्ती असलेली व्यक्ती म्हणजे श्री रतन टाटा हे त्यांच्या संपत्ती वरून कमी तर त्यांच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून जास्त ओळखले जातात, आपले लाडके पु.ल.देशपांडे हे त्यांच्या पोषाखावरून नाही तर त्यांनी साहित्यात मांडलेल्या विचारातून जास्त ओळखले जातात.
दैनंदिन जीवनातील उदाहरुन द्यायचा झालं तर social media वर एखाद्या मित्राच्या फोटोला एखाद्या मैत्रिणीने flying kiss ची कंमेंट केली तर तिला त्याचं काही वाटत नाही पण त्याच फोटोला like आणि कंमेंट करणारे दुसरे मित्र त्या मुलीविषयी वेगळं मत बनवू शकतात, अर्थात त्या मैत्रिणीने काही चुकीचं नाही केलं फक्त सामाजिक भान न ठेवता व्यक्त होऊन बसली. मी समाजाबद्दल किंवा इतरांच्या दृष्टीने वागावे असं नाही सांगत आहे पण दुसऱ्यांसाठी कधी विषय नका बनू हे म्हणतोय. व्यकितमत्वाचा पहिला नियम काय म्हणतो कि पहिले स्वतः बदला मग दुसर्यांना शिकवा, आता जर तुमचे विचार आणि कृती ह्यात तफावत असेल तर तुमचा व्यक्तिमत्व कधीच चांगले नाही होणार. तुम्ही तुमचं वागणं बोलणं हे एका शस्त्रासारखा वापरला तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा खूप चांगला विकास होऊ शकतो. म्हणजे कुठला शस्त्र कुठे वापरायचा ह्याचा जसा आपला अभ्यास असतो तसंच कुठे आणि कसं वागावं आणि बोलावं हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा य्वक्तित्व चांगले होईल.
व्यक्तिमत्वाचा विकास हा तुम्हाला बऱ्याच गोष्टीतून अनुभवावा लागेल, जसं कि ज्यांचे विचार चांगले आहेत त्या व्यक्तींना follow करा, चांगली पुस्तके वाचा, तसंच सामाजिक बांधीलकी दाखवून गरजूना मदत करा. ह्या सगळ्यांनी तुमच्या विचारांचा विकास नक्की होईल कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला positive energy देऊन जातात आणि जिथे positive energy असते तिथे चांगल्या विचारांचा वास असतो.
मित्रांनो आज आपली तरुण पिढी जी आहे ती खूप मागे आहे व्यक्तिमत्व ह्या विषयात आणि हि पिढी घडवायची असेल तर आपल्याला काही तरी करणं गरजेचं आहे. आजचे पालक ह्या बेसिक गोष्टीवर लक्ष केंद्रित नाही करत म्हणून बऱ्याच वेळा तरुणाई भरकटते असं मला वाटते. जर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांना ही गोष्ट शिकवली तर मला वाटते ह्यात बराच बदल होऊ शकतो.
मी ह्याची सुरुवात केली आहे माझ्या स्वतापासून आणि तुम्हाला जर हे पटत असेल तर तुम्ही पण आपल्यापासून सुरवात करा आणि थोडासा बदल घडवण्यात हातभार लावूया. नेहमीप्रमाणे हेच म्हणेन मित्रांनो पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. आवडला तर प्रसार करा आणि इतरांना प्रवृत्त करा शेवटी आपणच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो कोणी दुसरा आपल्याला मदत नाही करणार.
-स्वप्निल पातकर (३०/०८/२०२०)
No comments:
Post a Comment