Tuesday, August 11, 2020

सामाजिक बांधिलकी

    मित्रानो, मागच्या ६-७ महिन्यांपासून आपण सगळे करोना महामारीमुळे घरामध्ये अडकून पडलो आहोत. ह्या महामारीमुळे बरेचसे उद्योग धंदे ठप्प पडले आहेत आणि त्याचा फटका बऱ्याच जणांच्या नोकरीवर पडला आहे. तसेच रोजंदारीवर जगणाऱ्या गरीब कुटुंबावर दोन वेळच्या जेवणाची फार मोठी पंचायत झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपण जे आर्थिक दृष्ट्या ह्या लोकांपेक्षा थोडे विकसित आहोत म्हणून आपण थोडीशी मदत करणे अपेक्षित आहे.

अशीच एक मदत मला करावीशी वाटली आणि मी माझा वर्गमित्र चंद्रकांत धापटे ह्याला फोन केला आणि मला मदत करायची आहे अशा कुटुंबाना असा सांगितलं, तर त्याने जराही आढेवेढे ना घेता त्याच्या गावातील कुटुंबाची माहिती गोळा केली आणि मला सांगितली. मग आम्ही दोघांनी मिळून, म्हणजे मी आर्थिक मदत त्याला दिली आणि त्या आर्थिक मदतीतून त्याने रोज लागणाऱ्या धान्याची व्यवस्था करून आज दिनांक ११ ऑगस्ट २०२० नजीकच्या गावातील १२ गरीब कुटुंबाना त्याची मदत केली. मला खात्री आहे आमच्या ह्या छोटयाशा मदतीने त्या कुटुंबाचे काही दिवस तरी व्यवस्थित जातील आणि आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील.
तसेच मित्रानो काही दिवसांपूर्वी कोंकणात जो चाकरी वादळाचा तडाखा बसला होता त्या तडाख्याने बऱ्याच गरीब आदिवासी वस्तीमध्ये घरांची नासधूस झाली होती, मी आमचे मित्र महेश देशपांडे ह्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं कि श्रीवर्धन येथे वनवासी कल्याण आश्रमातर्फे घर बांधायचा प्रकल्प चालू केलाय आणि त्याच आताच भूमी पूजन झालाय तर तूला जी आर्थिक मदत करायची असेल तर तू करू शकतोस, आणि मी माझ्यातर्फे ५०००/- ची आर्थिक मदत ह्या कामासाठी केली, आता मला माहित नाही की ह्या छोट्याशा मदतीने त्याने किती हातभार लागणार आहे पण थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणीनुसार आपण सुरवात केली आहे. मला खात्री आहे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल आणि त्या गरीब कुटुंबाला एक राहायला डोक्यावर छप्पर मिळेल.
तर मित्रानो हे सगळं आज मी ह्या पेज वर प्रसिद्धीसाठी टाकत नाही आहे तर ह्यामागचा उद्देश एवढाच की माझ्या सर्व मित्रांनी अशा सामाजिक कार्यासाठी पुढे यावा आणि वर्षातून एका तरी सामाजिक कार्याला कुठल्याही प्रकारे मग ती आर्थिक असो, कपडे, किंवा जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी.
मी केलेल्या कामाचे काही क्षणचित्रे तुमच्या माहितीसाठी टाकतो आहे. हि सगळी काम आपण SP's Friends Club तर्फे केली आहेत. माहिती वाचलीत त्यासाठी धन्यवाद!!







No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...