मित्रांनो आज विचार केला की सरत्या वर्षावर म्हणजेच 31st पार्टी कींवा new year पार्टी वर काही तरी लिहावं.
मला अजून पण year end पार्टी कींवा new year celebration पार्टी म्हणजे काय ते समजलं नाही. माझ्या मते जाणाऱ्या वर्षाला बाय बाय कींवा येणाऱ्या वर्षाचे स्वागतआपल्यातलेच काही लोकं दारू आणि नॉनव्हेज पार्टी करून करतात. अर्थात काही लोक अपवाद असतात ह्याला जे व्हेज पार्टी देखील करतात. पण जर आपण आजूबाजूला पाहिले तर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस बरेचसे लोकं हे कुठल्या तरी हिल स्टेशन वर जाऊन celebrate करतात. जसं मी पहिले म्हणालो की हे celebration बऱ्याच अंशी दारू आणि नॉनव्हेज पार्टीचं असत, आता मला हे कळत नाही कि वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा सेलेब्रेशन दारू पार्टी करून काय मिळतं? म्हणजे 31st ची रात्र तुम्ही दारू पिऊन झिंगणार आणि नवीन वर्षाच्या पहाटे तुमच्या डोक्यात अजून पण दारूची नशा असणार, ह्याचा अर्थ वर्षाची सुरुवात हि दारूच्या नशेने होते. मला तर फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं कि "पिने आलो को पिने का बहाना चाहिए" बाकी काही नाही. मुंबई मध्ये तर लोकं marine drive वर गर्दी करतात काहीजण गेटवे ऑफ इंडिया वर गर्दी करतात celebration करायला, अरे पण का? राहूदे त्या समुद्राला शांत तुमचे dJ वरचे अभद्र डान्स आणि पार्ट्या आणि ते फटाके आणि त्यांचा तो कर्णकर्कश आवाज ऐकायला तो समुद्र खळाळत नाही. उद्या कोणी तुमच्या अंगणात असे उपद्रव केले तर चालतील का तुम्हाला?.
बरं आपल्यातले काही लोकं नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी रात्रीपासून प्रसिद्ध देवस्थानाच्या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लावतात, ह्याच उद्धिष्ट काय तर वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करायची, ह्यावर मला असं विचारायचा आहे ह्या लोकांना की वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात जो देवारा असतो आणि त्यात जे काही देव असतात ते काय संपावर असतात की त्यांचा आपल्याला विसर पडतो की त्यादिवशी तुम्हाला त्याच्यापासून आशीर्वाद मिळत नाही? आपलेच आजी आजोबा, आई वडील कींवा मोठी लोकं सांगून गेलीत की कुठल्याही चांगल्या दिवसाची सुरुवात स्वतःच्या घरातून करा मग आपल्याला ह्या गोष्टीचा विसर का पडतो? प्रसिद्ध देवस्थान तुमच्या ह्या कृतीमुळे रग्गड पैसा कमावतात त्यादिवशी आणि तुम्ही देवाला कितीवेळ बघता फक्त 5-10 सेकंद? त्यापेक्षा घरच्या देवाला 1 तास द्या आणि दानपेटीत टाकणाऱ्या पैस्याने गरजवंताला मदत करा पुण्य मिळेल तुम्हाला.
खरंच 31st ची पार्टी असो किंवा new year celebration ह्याची गरज आहे का? जर आपण हे celebration नाही केलं तर कॅलेंडर वरची तारीख बदलायची थांबणार आहे का? आणि तुम्हाला celebration करायचं असेलच तर तुम्ही घरात राहून सांस्कृतिक कार्यक्रम बघून, घरातल्या सर्वांबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रम प्लॅन करू शकता आणि हे सर्व जर तुम्ही केलं तर त्याला नवीन वर्षाच स्वागत नाही का म्हणता येणार? बरं आजकाल बऱ्याचशा सोसायटी मध्ये लहान मुलांना बरोबर घेऊन मुलांच्या आया 31st पार्टी एन्जॉय करतात, हे सगळं करून तुम्ही काय आदर्श ठेवता मुलांसमोर? उद्या तुमचा मुलगा मोठा झाल्यावर 31st ला दारू पार्टी करू लागला कींवा मुलगी पब मध्ये पार्टी करू लागली तर त्यांचं काय चुकलं? एक लक्षात ठेवा चुकीच्या संस्काराची सुरुवात ही नेहमी आपल्या घरातूनच होते त्यामुळे जगाला दोष देऊन काही फायदा नाही. पाश्चात्य संस्कृती किती घ्यायची आणि किती सोडायची हे कळलं पाहिजे, तिकडची लोक जेवढ्या पार्ट्या करतात ना तेवढेच technology मध्ये देखील अग्रेसर असतात पण आपण त्यांचा फक्त पार्ट्यांचा आदर्श घेतो बाकी प्रगतिशीलता नाही घेत हे कितपत योग्य आहे?
तर मित्रांनो नवीन वर्षाचा स्वागत करायचं असेल तर घरी सर्वांबरोबर करा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, गरजवंताला मदत करा आणि घरच्या देवाचे आशीर्वाद घ्या आणि मी सांगतो हे जर केलं तर येणारं वर्ष तुम्हाला सुंदरच जाईल. एक वर्षी हे पण करून बघा कदाचित हे तुम्हाला जास्त आवडेल
आणि नाहीच आवडलं तर त्याच्या पुढच्या वर्षी तुमची परंपरा चालू ठेवा.
नेहमीप्रमाणे हेच सांगेन मला जे पटलं ते मी मांडायचा प्रयत्न केलाय, तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या शेवटी सगळ्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे नाही का
. धन्यवाद!!!
तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
- स्वप्निल पातकर
No comments:
Post a Comment