आज मी महिलांची हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपालची biography वाचत होतो आणि कसं एका cycle ओढून दिवसाला 80 रुपयेकमावणाऱ्या वडिलांनी मुलीला हॉकी खेळण्यासाठी मदत केली हे वाचून थक्क झालो. अर्थात सगळेच नॉनक्रिकेट प्लेयरची अशीचकाही तरी गाथा आहे म्हणजे घरात काही नसताना त्यांनी खेळासाठी सर्वस्व पणाला लावून देशाचं नाव मोठ केलंय, तुम्ही बघाना पि. टी. उषा, अंजु जॉर्जे, मेरी कोम, गीता फोगट हि काही मला माहिती असलेली नाव ज्यांनी घरची परिस्थिती खराब असताना पण खेळामध्येनाव कमावलं आणि देशाचं नाव उंचावलं.
आज जर आपण आजूबाजूला बघितलं तर असे किती तरी पालक बघाल ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली असते तरी देखीलते आपल्या मुलांना खेळात प्रोत्साहन देण्यापेक्षा CBSE, ICSE बोर्ड मध्ये शिक्षण देण्यासाठी शेजारच्या मुलाबरोबर compete करतात.
मला आठवते मी जेव्हा मुंबईच्या ओव्हल ग्राउंड, आझाद मैदान वरून जायचो तेव्हा फक्त क्रिकेट प्रॅक्टिस करणारी मुलं दिसायची, पणफुटबॉल च्या ग्राउंड वर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं दिसायची, हॉकी कुठे दिसलं नाही, इव्हन टेनिस कोर्ट वरशुकशुकाट असायचा. हे सगळं बघून पालकांच्या मानसिकता लक्षात येते कि जिथे पटकन फेमस होता येते अशा खेळात मुलांनाप्रोत्साहित करतात, आज हॉकी मध्ये बोला, टेनिस मध्ये बोला, बॉक्सिंग बोला, athelitics बोला तुम्हाला फक्त कुठून तरी छोट्याकुटुंबातील आलेली खेळाडूच दिसेल पण आपल्यासारख्या प्रगत राज्यातील मुलं मुली दिसणार नाही.
आपल्या शाळेत जेवढे मैदानी खेळ खेळले जायचे किंवा आजही जे खेळले जातात ते सरकारने सगळ्या शाळांना मग त्या CBSE, ICSE माध्यम असो त्यांना अनिवार्य (compulsary) करायला पाहिजे, तसेच ह्या शाळांना सुद्धा असे खेळ स्टेट, नॅशनल लेवल मध्येखेळायला विध्यार्थाना प्रोत्साहित करायला पाहिजे. आणि एक गोष्ट आता प्रत्येक शाळा जे parents मीटिंग ठेवतात त्यातविध्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रगती discuss करतात तेवढेच महत्व पालकांना मुलांना खेळात सुद्धा प्रगती करावी ह्यासाठी प्रबोधनकरायला पाहिजे. प्रभोधनाशिवाय प्रगती नाही आणि ही नीती जर शाळांनी नाही अंगिकारली तर आपली मुलं फक्त online खेळातपारंगत होतील आणि त्या खेळाला आपण जास्त महत्व देऊ शकत नाही.
कृपया सर्वांनी मैदानी खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करूयात जेणेकरून खेळ हा प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात compulsary विषय बनला पाहिजे आणि त्यात पण पास आणि नापास असे निकष असायला हवे तरच मुलांना ह्या मैदानी खेळात रस निर्माण होईलआणि ह्यातून राष्ट्राला किती तरी चांगले खेळाडू मिळतील आणि आपण पण आपल्या देशाला पदक पालिकेत अग्रस्थानी बघुयात.
मित्रांनो आपल्यात पण काही शिक्षक मित्र मैत्रिणी आहेत /असतील यांनी हा विषय लावून धरा तुमच्या लेवल वर जेणेकरून हे कुठेतरी ऐकलं जाईल आणि त्याची मदत मुलांना होईल आणि त्यांचे पालक प्रेरित होऊन खेळाला प्रोत्साहित करतील. धन्यवाद!!!