Sunday, August 15, 2021

स्वातंत्र्यदिन विशेष

    75 व्या स्वतंत्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाखरं म्हणजे स्वातंत्र्यदिनाचं महत्व खूप मोठं आहे पण आपण ते एक सार्वजनिक सुट्टीम्हणून समजून कमी केलाय.

   आपला देश 1947 ला स्वतंत्र जरूर झालाय पण अजूनही आपल्याकडे जातीभेदआरक्षणनिरक्षरतास्त्रीभ्रूण हत्यास्त्रियांनाअजूनही पुरुषानं इतकेच सगळीकडे महत्व प्राप्त झाले नाही अशा अनेक समस्या जशाच्या तशा आहेतआपला देश ह्या सगळ्यांमधूनजो पर्यंत स्वतंत्र होत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने आपण देश स्वतंत्र झाला असा म्हणता येणार नाहीकुरघोडीच्या पॉलिटिक्सच्याविळख्यातून जेवढ्या लवकर देश स्वतंत्र होईल तेवढ्या लवकर देशाचा विकास होईलगावा  गावात प्रगत शिक्षण आणि खेळाविषयीमहत्व जो पर्यंत पोहचत नाहो तो पर्यंत आपला देश काही स्वतंत्र झाला असा वाटत नाहीशेतकऱ्यांची आत्महत्यासावकारांची अरेरावीराजकारण्यांची शिक्षणसंस्था तसेच मोठ्या आर्थिक पेढीवर असलेली मक्तेदारी जो पर्यंत जात नाही तो पर्यंत आपला भारत देश स्वतंत्रझाल्यासारखा वाटणार नाही.

     असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत जे आपण स्वतःहून पुढाकार घेऊन सोडवले पाहिजेतआज आपण फक्त जागेवर बसून दुसर्यानेकाय तरी करावं अशी अपॆक्षा करतोयजो पर्यन्त हि मानसिकता कमी होत नाही तो पर्यंत भारत देश स्वतंत्र झालाय असं वाटणार नाहीतर मित्रांनो हि अशी खंत वर्षानु वर्ष चालूच राहणार आहे असं वाटते त्यामुळे प्रत्येकाने काही तरी  वसा घेऊन वर्षाला एक तरी सामाजिककार्य करावा जेणेकरून एखाद्याच्या प्रगतीला हातभार लागेलबाकी हे माझा वयक्तिक मत आहे त्यामुळे पटलं तर आत्मसात करा आणिदेशाच्या विकासात भाग घ्यासर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! भारत माता की जय!!!

No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...