Tuesday, October 27, 2020

मानसिकता

    एका नाजूक विषयावर लिहावंसं वाटलं आणि बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती देखील लिहायची पण नाजूक विषय म्हणून हात धजावत नव्हते लिहायला. पान आज हिम्मत करतोय लिहायची आणि अपेक्षा करतो तुमच्याकडून विषय आवडला तर फक्त जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये फॉरवर्ड करायची.

बऱ्याच वर्षांपासून आपण मुलींवरच्या अत्याचाराची प्रकरणं ऐकतोय, वाचतोय आणि वृत्तवाहिन्यांवर त्याचे विश्लेषण पण ऐकतोय. जेव्हा अशा घटना घडतात त्यावर बऱ्याच वेळा आपण एकमेकांशी चर्चा करतो, जास्तीत जास्त शिक्षा होयला हवी किंवा सरकारने कडक कायदा करायला हवा अशा कृत्यांसाठी अशी आपण बरीच बडबड करतो, पण काही दिवसांनी आपण आपापल्या कामात गुंतून जातो आणि मग हा विषय परत दुसरी घटना होईपर्यंत थंड पडतो.
मित्रांनो खरं म्हणजे हा विषय एकदम सुटणारा नाही आहे, एकीकडे आपण मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणायचं आणि दुसरीकडे मुलींवर शाररिक मानसिक अत्याचार करायचे, अशी जर मानसिक अवस्था असेल आपली तर हे कधीच थांबणार नाही. मला असं वाटते की हे जर थांबवायचं असेल किंवा ह्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत नसेल येऊ द्यायच्या तर सुरुवात ह्या बदलाची आपल्या घरातून होयला हवी.
आजच्या social नेटवर्किंगच्या जगात पालक मागे राहिलेत आणि मुलं पुढे निघालीत ज्यामुळे पालक आणि मुलांमध्ये संवाद कमी झालाय. काय आहे ना आजकालचे पालक मुलांना स्मार्ट फोन घेऊन दिला कि आपली जवाबदारी संपली ह्या अविर्भावात राहतात. सर्व पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्या 10 पैकी 5 मुलींवरचे अत्याचार हे परिचयातल्या लोकांनी केलेले असतात आणि ह्याला जवाबदार कोण तर सोसिअल नेट्ववर्किंगवर पालकांनी मुलांना दिलेला फ्रीडम. आपला मुलगा किंवा मुलगी कोणाबरोबर बोलते, त्यांचं friendcircle कसं आहे, ते कोणाला भेटतात वैगरे अशा गोष्टी पालकांना माहिती असायला हवं. मुलं रात्री बेरात्री social अँप वर कोणाशी गप्पा मारतात कींवा काय बघतात हे पालकांनी विचारायला हवं, बऱ्याच वेळेला मुलं बाहेर पडतात हे सांगून की अमुक एका व्यक्तीला भेटायला जातोय आणि पालक पण हो म्हणतात कारण कधी तरी त्यांनी पण त्या व्यक्तीचे नावं ऐकलेलं असतं, पण ती व्यक्ती कशी आहे, काय करते आणि आपल्या मुलाचं त्याच्याशी काय नातं आहे ह्याची माहिती पालकांना असायला हवी जे पालक करत नाही.
आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही आणि मग पुढे अशा काही गोष्टी बाहेर होतात आणि मग आपण मुलांच्या चुकींना दोष देत बसतो, पण टाळी एका हाताने कधी वाजत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. मुलगा जर चुकीच्या मुलांच्या संगतीत राहिला तर तो त्यांच्या चुकीच्या गुणांच अनुकरण करणार आहे, आणि मुलगी जर जास्त मुलांमध्ये राहिली तर तिचा बिंधास्तपणाचा कधी ना कधी कोणी तरी मानसिक किंवा शाररिक फायदा घेणारच. आपण पालक म्हणूंन व्यक्तिस्वातंत्र आणि व्यभिचार ह्यातला फरक मुलांना वेळीच समजावून सांगितला तर मला वाटते आपण मुलांच्या बाबतीत बऱ्याचशा चुकीच्या घटना टाळू शकतो.
आपण खूपवेळा आपला मुलगा कींवा मुलगी शिकलेली आहे त्यामुळे तिला सगळंच कळत ह्या अविर्भावात राहतो आणि आपली मुलं पण त्याच अविर्भावात राहतात. बाप आणि मुलगा ह्याने समोर दारूचे दोन पेक एकत्र बसून प्यायल्याने कींवा मुलीने त्याच्या मित्राला घरी बोलावून बेडरूम मध्ये एकत्र गप्पा मारल्याने पालकांविषयीचा धाक कमी नको होयला, पालक आणि मुलांमध्ये मित्रत्वाचा नातं जरूर असावा पण पालकांनी चुकीच्या गोष्टींमध्ये मुलांचा कान पण पिळायला हवं जेणेकरून मुलांमध्ये थोडी तरी आदर वजा भीती असायला हवी. परत एकदा सांगतो व्यक्तिस्वातंत्र मुलांना द्यावा पण त्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुलं गैरफायदा तर घेत नाहीना हे वेळोवेळी तपासून पण पहा.
मला असं देखील वाटते जेवढी पालकांची जवाबदारी आहे तेवढीच मुलांची देखील आहे स्वतःला सुरक्शित ठेवायची तसेच चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये रहायची. मुलींनी ज्या मुली social networking अँप चा वापर करतात त्यांनी बघाव की त्यांचा मित्र किती adult पेज ला follow करतो, त्याचे मित्र त्याच्या पोस्ट वर किती abusive भाषेत कंमेंट करतात, त्याचं पोलिटिकल मत किती चुकीच्या पद्धतीने तो social site वर मांडतो. ह्या सगळ्या गोष्टींचा माणूस म्हणून त्या मित्राला ओळखायला तुम्हाला मदत होईल, वरवर चांगले बोलणारा मित्र आतून कसा आहे हे ओळखणं पण तेवढच महत्वाचं आहे. पुढची ठेच मागचा हुशार हि म्हण नेहमी लक्षात ठेवा.
मुलांना मोठं करायला पालकांच आयुष्य जातं आणि हीच मुलं जेव्हा हाताबाहेर जातात कींवा त्यांच्या बरोबर काही तर अघटित घडत तेव्हा डोक्यावर हात लावायची पाळी येते तेव्हा त्यासारखा आयुष्यातला दुर्दैवी क्षण त्या पालकांसाठी कुठलाच नाही असं मला वाटते. संस्कार आणि पाश्चिमात्य संस्कृती ह्यांचा balance जर पालकांनी मुलांच्या आयुष्यात ठेवला तर मला वाटते समाजात फार कमी चुकीच्या घटना घडतील आणि आपली मुलं चांगल्या विचारांची होतील.
एका मुलीचा बाप झाल्यावर मला असं वाटते माझी जवाबदारी खूप वाढली आहे, आणि मला जर माझ्या मुलीला समाजातल्या वाईट नजरांपासून वाचवायचं असेल तर चांगले संस्कार तर करावेच लागतील पण चांगलं वाईट काय आणि कसं ओळखायचं ह्याचं शिक्षण पण तेवढंच आत्मीयतेने द्यावं लागणार आहे. माझं कुटुंब माझी जवाबदारी हे जे आपण करोना साठी आज राबवतोय तेच आपण मुलांच्या चांगल्या विचारांसाठी आणि भवितव्यासाठी राबवूया, म्हणजे सुरुवात जर प्रत्येकाने आपल्या घरातून केली तर नक्कीच मुलांच्या विचारात आणि कृतीत काही तरी चांगलं घडेल.
मी आज हे जे काही लिहिलंय ते माझ्या बाहेरच्या घडणाऱ्या घटना आणि जवळच्या काही लोकांचं वागणं ह्यातून आलेल्या अनुभवातून लिहिलंय. आशा करतो तुम्हा सर्वांना ते पटेल आणि तुम्ही सर्व आणि तुमचे मित्रपरिवार ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करून ह्याच महत्व इतरांना पटवून द्याल.
धन्यवाद!!
- स्वप्निल पातकर (27/10/2020)

Sunday, October 25, 2020

दसरा विशेष

    मित्रांनो आज दसरा एक विशेष सण ज्याचं महत्त्व खूप आहे पण fashion च्या दुनियेत ह्या सणाचं महत्व आजकालच्या लोकांना माहिती नाही.

मी मराठी शाळेत शिकलोय अर्थात त्यावेळी इंग्रजी माध्यम नव्हतं आणि असतं तरी आमची ऐपत नव्हती तिकडे शिक्षण घ्यायची, असो तर मुद्दा हा आहे कि मराठी शाळेत असल्यामुळे ह्या सणाचं महत्व फार जवळून जाणलं आहे. लहान असताना दसऱ्याची कधी शाळेला सुट्टी नसायची पण शिकवत पण नसत त्या दिवशी. त्या दिवशी शाळेमध्ये दसऱ्याचा सण साजरा होयचा, दसरा म्हणजे काय तर विद्येची देवी सरस्वती मातेची पूजा, आता ही पूजा शाळेत पाटीवर सरस्वती मातेचं चित्र कडून त्याची फुल, हळद कुंकू वाहून पूजा करायची आणि मग सगळ्यांनी एक सुरात मास्तरांच्या सुरात सूर मिसळून आरती म्हणायची. ह्यातली गम्मत अशी कि शाळेत असलेल्या सर्व मुलांचा एकत्र टाळ्या वाजवण्याचा आवाज एवढा सुरात असायचा कि आजकालच्या मंडळाच्या आरत्यांना पण तो कधी येत नाही. बरं सरस्वती मातेचं चित्र काढण्यात पण स्पर्धा असायची त्यामुळे ज्याचं पाटीवरच चित्र चांगला त्याची शाळेत भाव असायचा, काही विध्यार्थी स्वतःहून चित्र काढायची पण मी मात्र आमच्या वडिलांकडून काढून घ्यायचो आणि आजही मला ते चित्र काढणं जमत नाही.
तर हा सण विद्येच्या देवीचा असतो आपली प्रगती ज्या गोष्टीमुळे होते त्या सर्व गोष्टी म्हणजे एक प्रकारची विद्येची माताचं असते, काहीजण कॉम्पुटरची पूजा करतात कारण ते त्यांच्या मिळकतीचा साधन असतं, काही जण शस्त्र, काहीजण पुस्तकं तर काहीजण धातूची पूजा करतात. बरं संध्याकाळी सोनं द्यायची पद्धत असते, बरं सोनं म्हणजे काय तर आपट्याच्या झाडाची पानं, ती पण आपण आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये घरी जाऊन वाटतो आजकाल जी लोकं जाऊ शकत नाही कींवा आळशी असतात ती whatsapp वर वाटतात , ह्या मागचा हेतू फक्त एवढाच असतो कि एकमेकांना पान वाटून आपण एकप्रकारची जवळच्या व्यक्तींची भेट घेतो जेणेकरून काही कटुता आली असेल त्यांच्यामध्ये तर ती नाहीशी होते. शेवटी काय नात्यामध्ये जेवढा संवाद आणि भेट तेवढे त्यात मतभेद कमी...असो.
आजकालच्या काळात ह्या सणाला फॅशनच वलय देऊन खरं महत्व पुसून टाकलंय, मला नाही आठवत आम्ही लहान असताना किंवा कॉलेज मध्ये असताना कधी गरबा कींवा दांडियाचा नाव एकलं असेल कींवा त्याचा कुठे अतिरेक झालाय अस पण नाही बघितल. पण आज ह्या सणाचा खरं महत्व फक्त दांडिया आणि गरबा एवढंच राहिलाय, बरं पारंपरिक खेळ म्हणून ह्या खेळाकडे बघितलं असतं लोकांनी तर ठीक होत पण एक business म्हणून बघितलं जाते आहे आणि नृत्य कमी आणि थिल्लरपणा जास्त वाढलाय. पालक सुद्धा आपल्या लहान मुलाला सजवून पारंपारिक वेषभूषा करून त्यात भाग घ्यायला लावतात, म्हणजे लहानपणापासून हेच ह्या सणाचं महत्व हे त्याच्यावर बिंबवलं जातं. ज्या देवीने नऊ दिवसात राक्षसाचा वध केला तिला सुद्धा हे जे काही नऊ दिवस चालते ते बघवत नसेल.
ह्या सगळ्यात विद्येची देवता माँ सरस्वती मागे पडते आणि प्रत्येकाला त्याचा विसर पडलाय. बुद्धीच्या देवतेचा विसर जर पडायला लागला तर हेच होणार ना जे आजकालचे पैसेखाऊ लोक करता आहेत. संस्कार सगळे विसरलेत आणि मला वाटते आज खरं तर चांगल्या संस्काराची गरज आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कारण प्रत्येकजण स्वार्थासाठी जगतोय, आई वडील ह्यांचा विसर पडत चालाय, महिलांवरील अत्याचार, आणि विशेष म्हणजे फक्त स्वतःसाठी जगता आहेत आजची लोकं. ह्या लोकांच्या घरात माँ सरस्वतीचा वास नाही आहे म्हणून आज हि लोक अशी वागता आहेत. शेवटी आई वडिलांच पण चुकतं फ्रीडम म्हणजे काय हे जर लहानपणापासून शिकवलं असतं तर आज सगळंच सुंदर दिसलं असतं.
मला तरी वाटते ह्या दसऱ्याला आपण सर्वानी पाटीवर माँ सरस्वतीचं चित्र काढून तिची विनम्र पूजा करून आपल्या घरात तिचं अखंड वास्तव राहावं आणि संस्काराची हि प्रथा अशीच उत्तरोउतर चालत राहो अशी प्रार्थना करूयात.
मित्रानो जे मला पटते ते मी लिहितो त्यामुळे पटलं तर प्रसार करा नाही पटलं तर सोडून द्या शेवटी सगळ्यांनाच व्यक्तिस्वातंत्र्य आहे नाही का 😊
*तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा* 💐
-स्वप्निल पातकर

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...