Sunday, September 20, 2020

नातं (Relation)

    मित्रांनो आज काही तरी लिहावं असं वाटलं आणि विषय डोक्यात आला तो म्हणजे नातं (relation).

आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच व्यक्तींना भेटतो मग त्या आपल्याच कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा सहप्रवासी असो की तोंडओळख असलेली व्यक्ती असो, त्यातल्याच काही व्यक्तींशी आपला नातं जुळत त्याला मग आपण मैत्रीचं नातं म्हणूया कींवा आपुलकीचा नातं म्हणूया.
प्रत्येक नातं वेगळं असतं मग ते मैत्रीचं नातं असो, प्रेमाचं नातं असो कींवा रक्ताचं नातं असो ह्या प्रत्येक नात्याचा गोडवा वेगळा असतो. प्रत्येक नातं हे खास असतं म्हणजे आई आणि मुलगी ह्यामधील मैत्री वजा प्रेम कुठेच बघायला मिळणार नाही, मुलगी आणि वडील ह्यातला प्रेम वजा respect तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही तसंच बहीण भावांमधली प्रेमळ भांडण आणि दोन दिवस अबोला कुठे बघायला नाही मिळणार. तसेच काही गोष्टी मैत्रीच्या नात्यामध्ये देखील असतात म्हणजे मैत्रीमधली असलेली विश्वास वजा प्रेम तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार, बरं विश्वास वजा प्रेम म्हणजे काय तर आपण आपले secrets फक्त मित्रालाच किंवा मैत्रिणीलाच सांगतो आणि तो मित्र किंवा ती मैत्रीण पण फक्त ते त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवतात ह्याला म्हणतात विश्वास तर मित्र कींवा मैत्रिणीसाठी काहीही आणि कसही करून मदत करणे आणि त्या मैत्रीसाठी जगाशी भांडणे ह्याला म्हणतात मैत्रिप्रेम. तसच काहीसं मुलगा आणि वडिलांच्या नात्यात असतं म्हणजे दोघांमध्ये मैत्री जरी असली तरी मुलगा वडिलांना घाबरतोच आणि ते पण फार कमी बघायला मिळेल दुसऱ्या नात्यात. मला वाटते आणि जे मला सगळ्यांच्या घरात बघायला मिळते ते म्हणजे आजी आणि नातवाचं नातं त्यात फक्त प्रेम असते बाकी काही अपेक्षा नसतात आणि असं निस्वार्थी नातं कुठेच बघायला नाही मिळणार, आजही आजीकडे जायचंय असं म्हणाल्यावर लहान मुलं फार आनंदित होतात.
बरीचशी लोकं अशी असतात त्यांना नात्याचा सहवास मिळत नाही अशी माणसं तुम्ही जर बघितली असतील तर ती थोडीशी कोडगी किंवा एका स्वभावाची असतात, तसेच ज्यांना विविध नात्याचा सहवास मिळाला असेल अशी माणसं तुम्हाला अष्टपैलू गुणांची दिसतील म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल.
वर्षानुवर्ष जेव्हा एका नात्यामध्ये आनंद, मस्ती, मजा असा प्रवास चालू असेल आणि अचानक तुम्हाला ती मजा मस्ती आणि आनंद जराही नाही जाणवला तर समजून जायचा कि गैरसमज नावाच्या तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या नात्यात प्रवेश केला आहे. आता ह्या तिसऱ्या व्यक्तीचा तुम्ही कसा सामना करता ह्यावर प्रत्येक नातं टिकतं. कोणीच कोणाच नातं तोडायला येत नाही, हे आपलं मन असत जे चुकीचा विचार करून गैरसमजाला तुमच्या मनाचा ताबा घेऊन तुम्हाला वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात आणि तुम्ही मग त्याला बळी पडता, ego आणि अविचार ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही नात्यामध्ये आली कि नातं कधीच टिकत नाही. तुमची वाणी आणि तुमचं मन ह्यावर जर तुम्ही ताबा ठेवला कि सगळी नाती व्यवस्थित टिकतात, आठवून बघा 10 पैकी 8 नाती ह्याच कारणाने तुटतात, जिभेवर ताबा नाही म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला काही बोलून जातो जेणेकरून समोरची व्यक्ती दुखावुन लांब होते, तसेच मनावर ताबा नसतो म्हणून समोरचा माणूस सुरवातीला चांगला दिसतो पण कालांतराने त्याच समोरच्या माणसाचे वाईट गुण आपल्याला दिसतात आणि मग आपण त्या माणसापासून लांब होतो. बरं जी नाती घट्ट असतात ना ती सहसा तुटत नाही अगदी तुम्ही बोलायचं बंद केलंत कींवा तुमच्या mobile मधून कॉन्टॅक्ट जरी delete केलात त्या व्यक्तीचा तरी ती व्यक्ती मनात कायम घर करून राहते.
तर मित्रानो नाती टिकवायची असतील तर मन प्रसन्न ठेवा, डोक्यात अविचार आणू नका, जिभेवर ताबा ठेवा आणि ऐकून घेण्याची क्षमता वाढवा आणि मग react करा म्हणजे गैरसमज होणार नाही. जेवढी listening पॉवर जास्त तेवढे गैरसमज कमी हा एक साधा नियम आहे आणि आपण नेमकी तेच विसरतो.
मी नात्याचा आदर करायचा शिकतोय आणि मी वाणी तसंच मनावर पण ताबा ठेवायचं शिकतोय जेणेकरून मी कोणाला दुखवू नये कधी, ह्या जगात आपण भले रडून जन्म घेतलाय पण हसत निरोप घ्यायचा हेच उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवायचा आणि तसं वागायचं, बघूया कितपत जमत ते.
तर मित्रानो आपलं नेहमीचच मी काय लेखक नाही कि फिलॉसॉफर नाही, मला जे पटलं ते मी लिहिलं, तुम्हाला पटलं तर घ्या आणि पुढे पाठवा आणि नाही पटलं तर सोडून द्या कारण सगळ्यांनाच व्यक्ती स्वातंत्र्य आहे जगण्याचं 😊.
-स्वप्निल पातकर (20/09/2020)

Saturday, September 5, 2020

शिक्षक दिन (Teacher's Day)

    आज शिक्षक दिन आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल काही तरी लिहून कृतज्ञता व्यक्त करायला हवी ना!!

आज पर्यंत आपल्याला असंख्य शिक्षक भेटलेत म्हणजे अगदी बालपणापासून तर आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथपर्यंत खूप जणांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. सुरुवात शाळेतल्या शिक्षकांपासून झाली, आपल्या बालपणात जर आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला संस्काराचे धडे दिले नसते तर आपला पाया मजबूत नसता झाला, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणाना जर त्यांनी प्रोत्साहन नसतं दिलं तर आपल्यातले बरेचसे विध्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानामध्ये अडकून राहिले असते, आणि पुस्तकी ज्ञान सगळ्यांनाच असते फक्त ते प्रत्येकाच्या मेंदूच्या क्षमतेनुसार त्यांना कळते म्हणून कोणी वर्गात पहिला येतो तर कोणी दुसरा येतो. पण शाळेमधली वक्तृत्व स्पर्धा असो कींवा मैदानी खेळ असो हेच शिक्षक आपल्याला त्यामध्ये भाग घ्यायला सांगतात ह्यामागचा त्यांचा उद्देश फक्त आपण अनुभव घेणे एवढाच असतो, माझा वयक्तिक मत असं आहे की आज त्या शिक्षकांनी आपल्याला तो अनुभव नसता दिला तर आपण आयुष्यात कधीच व्यासपीठावर उभे नसतो राहिलो मग तो interview असो, स्पर्धा परीक्षा असो किंवा आयुष्यातला कठीण प्रसंग असो आपला पाया मजबूत असतो म्हणून आपण धैर्याने त्या प्रसंगांना सामोरे जातो. बऱ्याच वेळेला आपल्याला काही लोकांपासून चुकीचं पण शिकायला मिळते मी तर त्या व्यक्तीला पण आज शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देईन कारण त्या व्यक्तीमुळे मला बरोबर आणि चूक ह्याचा अर्थ कळाला, आणि जो पर्यंत चूक कळत नाही तो पर्यंत आपण जमिनीवर येत नाही. विचार करून बघा चूक समजल्यावर तुम्ही हवेत असता कि जमिनीवर येता ते 😊
आपल्या आज पर्यंतच्या आयुष्यात खूप लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि आपल्या प्रगतीच्या वाटचालीत ते सहभागी झाले आहेत मग त्यात सगळे आले अगदी मित्र मैत्रीण, ऑफिसमधले सहकारी, दैनंदिन प्रवासात भेटलेली व्यक्ती हे सगळे काही ना काही शिकवून जातात. ह्याच बरोबर आपले कुटुंब ज्यांनी आपल्याला संस्कार शिकवलेत, आपला हात पकडून आपल्याला चांगला मार्ग दाखवला आणि आपल्या त्या प्रवासात भाग देखील घेतला अशा ह्या कुटुंबाला आपण आपल्या आयुष्यातला पहिला शिक्षक म्हणून नमन करूयात 🙏🏻.
मी माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती जिने मला चांगलं वाईट शिकवलंय त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो 💐
तुम्ही सर्व माझ्यासाठी एक शिक्षकच आहात जे मला काही ना काही नवीन रोज शिकवतात त्यामुळे तुम्हा सर्वांना पण शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
आणि मित्रांनो आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला आपण शिक्षक म्हणजे काय ह्याचा अर्थ समजावयला पाहिजे कारण जर त्यांना हा अर्थ कळाला तर समाजात चालेल्या चुकीच्या गोष्टी फार लवकर कमी होतील हे माझा वैयक्तिक मत आहे.
-स्वप्निल पातकर (05/09/2020)

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...