आज गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जडणघडणीत ज्यांच योगदान आहे अशा सर्व गुरूंना नमन करण्याचा दिवस. आपण सगळेचलहानपणापासून ते आतापर्यंत काही ना काही शिकत असतो, तसेच आपल्या ह्या प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतातज्यांच्यामुळे आपण काही तरी नवीन शिकत असतो आणि मला वाटते ते आपले गुरूच असतात.
शिकण्यासाठी असं काही वय वैगरे नसते आणि शिकणं कधीच थांबत नाही अगदी उतार वयात सुद्धा अशी काही मंडळी आहेत जेकाही तरी नवीन शिकतात आणि तरुणांना लाजवतात. माझं स्वतःचा सांगितलं तर मी आज जे काही शिकलोय मग ते संस्कार असोकींवा अवांतर छंद असो त्याची आवड मला शाळेतल्या शिक्षकांनी लावली, म्हणजे अभ्यास व्यतिरिक्त देखील इतर गोष्टी जसे की खेळ, वक्तृत्व स्पर्धा, कला स्पर्धा ह्यात भाग घ्यायला नेहमी प्रोत्साहन दिलं, आज त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे मी सगळ्या गोष्टींना सहजसामोरे जातो आणि मी तीच वृत्ती माझ्या मुली मध्ये पण आणायचा प्रयत्न करतोय. आज त्या गुरूंना माझा नमस्कार ज्यांनी मला ह्यालायक बनवलं.
आज प्रोफेशनल करियर मध्ये देखील मला खूप गुरु भेटले ज्यांनी माझ प्रोफेशनल नॉलेज पॉलिश केलं आणि माझ्या प्रगती मध्येमोलाचा वाटा उचलला त्यांना देखील माझा वाकून प्रणाम. अनेक मित्र देखील भेटले ज्यांच्या सहवासात राहून ट्रेकिंगची आवड निर्माणझाली, तसेच फोटोग्राफी ची आवड निर्माण झाली आणि हे छंद मी आजपण जोपासतो आहे म्हणून त्यांना पण माझा प्रणाम, मित्रांनोतुम्ही नसते तर आयुष्य खूप निरस झालं असतं.
आपल्या आयुष्यात अशी पण काही लोक येतात ज्यांच्यामुळे आपण काही तरी धडा शिकतो, काही व्यक्ती नकारत्मकता घेऊन येतातज्याने कधी कधी बरीच लोक डिप्रेशन मध्ये देखील जातात पण माझा एकाच सल्ला आहे कि आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकारआहोत म्हणून दुसर्यांमुळे आपण डिप्रेशन नाही घेत तर स्वतःमुळे घेतो, आपण ह्या व्यक्तींपासून संकटात कसे उभे राहायचे हे शिकायचेआणि त्यांना थँक यु बोलायचं हे शिकवल्यामुळे.
आज गुरुपौर्णिमा जो आजचा खूप सुंदर दिवस आहे त्या निमित्ताने मी सर्व गुरूंना नमस्कार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणिअसाच आशीर्वाद राहू दे माझ्यावर हि विनंती करतो.
-स्वप्निल पातकर 23072021