Sunday, February 27, 2022

मराठी भाषा दिन

   मित्रांनो आज मराठी भाषा दिन आहेहा दिवस म्हणजे फक्त शुभेच्छा देऊन कींवा मराठी गाणी लावून साजरा करण्याचा दिवस नाहीतर मराठी भाषा जी आज मागे पडली आहे तिला पूढे घेऊन कसं जात येईल तो प्रयत्न करण्याचा खरा दिवस आहे.

  मराठी भाषा जिने आपल्याला चालायलाबोलायला आणि भावनिक बनायला शिकवलंजेवढं आपल्या आई वडील आणि गुरुजनांनीआपल्याला घडवलं तेवढंच मराठी भाषेने सुद्धा आपल्याला मार्ग दाखवला आहे.

  लहान मूल जन्माला आलं कि पहिला शब्द शिकतो तो म्हणजे आईआपल्या जीवनाची सुरुवात ह्या सुंदर मराठी शब्दाने होते आणिमग जसजसे आपण शाळेत जातो तसे आपल्याला अनेक मराठी शब्द शिकवले जातातआजही मराठी वादविवाद स्पर्धा शाळेत होतातत्यासारखी दुसरी स्पर्धा नाहीकॉलेज मध्ये गेल्यावर कोणाला इंप्रेस करायचं असेल तर मराठी कविते शिवाय पर्याय नसतो 😊 कारणत्यात जेवढी भावना शुद्ध असते ती तुम्हाला इंग्रजी मध्ये नाही मिळणारआजही अत्रेपु. ह्यांचं साहित्य म्हणजे मराठी भाषिकांनापर्वणी आहेलता दीदींचा आवाज.दिमाडगूळकरकुसुमाग्रज ह्यांचे कवितेतले शब्दखळे काकाहृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीतम्हणजे मराठी गाण्याची कट्यार असायची जी सरळ हृदयाला भिडते.

  आज आपल्या महाराष्ट्रात सगळं असताना पण आपण आपली पूढची पिढी इंग्रजी शाळेत पाठवतोमला हे कळत नाही की इंग्रजीशाळेत घालून ह्या मुलांना कलाक्रीडा आणि भाषेचं वैभव काय असत हे समजणार आहे कामराठी कवितेचा साज ह्यांना समजणारआहे काविनोदाने समाज प्रबोधन करणारे पुह्यांना समजणार आहेत का

  मराठी भाषा टिकलीच पाहिजे आणि ती टिकवायची असेल तर सुरुवात आपल्या पासून कराइंग्रजी माध्यमातून जरी मुलं शिकतअसली तरी मराठी आवर्जून शिकवा तिकडे तडजोड नका करूमराठी भाषा हि मराठी दिनापर्यंत मर्यादित नका ठेवूमराठी भाषा हिदेवाने दिलेली देणगी आहे त्याचं जातं करा

   आपण मराठी भाषेला कधी खाली पडू देणार नाही ह्याचा मला दृढ विश्वास आहेशेवटी कितीही केली तरी मराठी भाषा हि आपलीआई आहे त्यामुळे कोणी तिला परके करणार नाही हि आशा करतो

       मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 

  -स्वप्निल पातकर 27/02/2023

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...