Sunday, January 16, 2022

मराठी शाळा

   काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने दुकानावरील पाट्या मराठीत लिहिणे बंधनकारक केले आहेह्या त्यांच्या निर्णयाच स्वागत आहेपण जो स्टॅन्ड मराठी नटी चिन्मयी सुमित ह्यांनी घेतलाय आणि जो मी कित्येक वर्षांपूर्वी सुद्धा बोललोय कि हाच न्याय तुम्ही मराठीशाळांना का नाही लावतजर मराठी शाळा राहिल्या  तरच मराठी व्यवस्थित वाचता येणार आहेना

  तुम्ही म्हणाल कि इंग्रजी शाळेत सुद्धा मराठी शिकवतातनाह्यावर माझा म्हणणं आहे की जेवण पण सगळ्याच हॉटेलमध्ये मिळते पणक्वालिटी जिकडे  असते तिकडेच आपण जेवतो नामराठी शाळेत जे मराठी व्याकरण शिकवलं जाते ते कुठल्याच इंग्रजी शाळेतशिकवले जात नाही हे माझं वयक्तिक observation आहेचेक करायचं असेल तर एका मराठी शाळेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यालामराठी वाचायला लावा आणि एका इंग्रजी शाळेतल्या विध्यार्थ्याला मराठी वाचायला लावा मग कळेल कोण सरस आहे ते.

  आणि मला म्हणायचं आहे कीका आमची मराठी शाळा downmarket आहे असं लोकांना वाटतेआज कित्येक वर्ष झालीतसुरवात शिक्षणाची संस्कृतदेवनागरी आणि मराठीतच झाली आहेआज जितके पण प्रसिद्ध व्यक्ती घ्या अगदी महाराष्ट्राचे आज पर्यंतझालेले मुख्यमंत्री असोमराठी नट आणि नटीप्रसिद्ध गायक  गायिका ह्यांनी मराठीत शिक्षण घेतले आहे आणि होतेजर हे सर्वत्यांच्या आयुष्यात सफल होऊ शकतात तर एका मराठी शाळेत शिकणारा विध्यार्थी का पुढे नाही जाऊ शकतत्याच्या गुणवत्तेवर शंकाकाआपण सगळे जण एखाद्याची गुणवत्ता काय फक्त त्याच्या इंग्रजी बोलण्यावरून ठरवणार आहोत कातसं असतं तर आपलेपंतप्रधान नरेंद्र मोदीजी (उदाहरण म्हणून घ्या)ह्यांचं शिक्षण गुजराथी मध्ये झाले आहे म्हणून त्यांचं इंग्रजी चांगलं नाही काआज त्यांनीप्रत्यक्ष देशात जाऊन व्यापारी संबंध प्रस्थापित केलेच ना मग आपण त्यांची गुणवत्ता त्यांना येणाऱ्या भाषेवरून ठरवणार आहोत काआणि नाहीच आलं इंग्रजी फ्लुएंट बोलता तर आपण उपाशी मरणार का?

  आजही मराठी शाळेत साजरे केले जाणार सण ज्यामुळे आपल्या मुलांना आपली संस्कृती कळतेथोर पुढाऱ्यांच्या साजऱ्या केल्याजाणाऱ्या जयंती पुण्यतिथी ह्यामुळे मुलांना आपल्या देशाचा इतिहास समजतोआज कुठली इंग्रजी शाळा एवढं आत्मीयतेने ह्या गोष्टीशिकवतेमराठी शाळांमध्ये आजही खो खोकब्बडीगोळाफेकभालाफेक ह्यासारखे पारंपरिक खेळ शिकवले जातात ज्यामुळेमुलांची शाररिक वाढ होतेडावपेच काय असते ह्याचा अभ्यास समजला जातोइंग्रजी शाळेत ह्यातले कुठले खेळ शिकवले जातातडावपेच शिकण्यासाठी कींवा बुद्धी वाढवण्यासाठी अबॅकस नावाचा व्यावहारिक पिल्लू मार्केट मध्ये इंग्रजी शाळांनी सोडलंय ह्याचीगरजच का आहे

  आजही मराठी शाळेतला विध्यार्थी कितीही मोठ्या पदावर असला आणि वाटेत त्याचे शिक्षक दिसले तर तो त्यांच्या पायावर डोकंठेवून आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाहीहे असे संस्कार कुठली इंग्रजी शाळा शिकवते

   पालकांनंतर जर मुलाला कोणी घडवत असेल तर ती त्याची शाळाआणि ती शाळा योग्य नसेल तर आपली मुलं संस्कार नाही तरआयुष्य हे एक प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट आहे हे शिकून बाहेर पडतीलशेजारच्यांनी मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपली पणतिकडेच गेली पाहिजे हा अट्टाहास आता सोडाकारण इंग्रजी शाळा फक्त पैसे घेणारी एक कंपनी बनली आहे तिकडे फक्त आणिफक्त प्रॉफिट बघितला जातोजे विध्यार्थी अभ्यासात चांगली आहेत त्यांचा ग्रुप करून त्यांनाच पुढे आणले जाते आणि बाकीच्यांनाट्युशनच्या नावाखाली लुटलं जातेआज देखील कुठल्याही मराठी शाळेत जा तिकडे सगळे विध्यार्थी शिक्षकांसाठी समान असतातआणि जे अभ्यासात कमी असतात त्यांना त्यांच्या लेवल वर जाऊन शिकवलं जातेबरं शिक्षक आपलं काम करतात पण जर पालकांनीथोडे त्यांच्या अभ्यासात लक्ष घातले तर प्रगती जास्त होऊ शकतेइंग्रजी शाळेतले प्रोजेक्ट पालकांनी करून मुलांची प्रगती नाही होऊशकत,मातीचा किल्ला बनवायचा असेल ना तर पहिले त्या किल्ल्याची स्वतःला माहिती असावी लागते मगच तो किल्ला बनवता येतोआणि हे फक्त एक मराठी विध्यार्थी करू शकतो.

  माझा सगळ्यांना एकच सल्ला आहे की महाराष्ट्रातील मराठी शाळा ह्या आपल्या आहेत त्यामुळे त्यांना आपणच जगवू शकतोदुसऱ्याराज्यात जाऊन बघा त्यांची लोकल भाषा तुम्हाला शिकावी लागते जर तिकडे राहायचं असेल तर मग आपण आपल्या राज्यातआपल्याच मायबोलीचा खून का करतोयआमची मराठी शाळा दिसायला जरी चांगली नसली तरी त्यातून शिकून बाहेर पडणाराप्रत्येक विध्यार्थी हा विचारांनी सुंदर असतो आणि हे मी अभिमानाने सांगेन.

  मित्रांनो जनजागृती करा आपल्या मराठी शाळेचीजराही लाज बाळगू नका आपला मुलगा कींवा मुलगी मराठी शाळेत शिकते आहेतरमाझी मुलगी मराठी शाळेत शिकते आहे आणि आम्हाला तिचे पालक म्हणून गर्व आहे आणि एक दिवस ती नक्की शाळेचं आणिआमचं नाव मोठं करेल ह्यावर विश्वास आहे आमचा.

मराठी शाळा जागलीच पाहिजे आणि त्यांचं मार्केटिंग माझ्या सर्व मित्रांनी केलच पाहिजे ही माझी माझ्या मित्रांकडून मला अपेक्षा आहे.

#savemarathischool 

  • स्वप्निल पातकर १६/०१/२०२२

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...