Thursday, April 22, 2021

जागतिक वसुंधरा दिवस (Earth Day)

     मित्रांनो आज जागतिक वसुंधरा दिवस (earth day) तसं बघायला गेलं तर हा दिवस जसे valentines day कींवा friendship day आपल्यातले काही लोकं celebrate करतात तेवढ्याच तन्मयतेने हा दिवस celebrate नाही केला जात.

मित्रांनो खरं म्हणजे आपण ज्या जागेवर राहतो, फिरतो, खेळतो ती जागा आपल्याला वसुंधरेने भाड्याने दिली आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. आज आपल्याला शुद्ध हवा, पाणी जे काही मिळते आहे ते हिच्याच कृपेने मिळते आहे ह्याची जाणीव कुणालाच नाही ह्यासारखा दुर्दैव्य नाही. स्वतःच्या घरात आपण कचरा करत नाही आणि केला तरी तो लगेच उचलून कचरा कुंडीत टाकतो पण तोच नियम आपण बाहेर कचरा करताना पाळत नाही आणि वाटेल तिकडे कचरा फेकून देतो.
मित्रानो आज आपण ज्या परिस्थिती मध्ये आहोत करोना तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त गंभीर परिस्थिती म्हणजे जागतिक तापमान वाढ, मित्रांनो आम्ही लहान असताना दिवाळीत थंडी असायची आणि फटाके वाजवताना कुडकुडायचो, जून महिन्याच्या 7 तारखेला जोरदार पाऊस यायचा, होळी नंतर खरी गर्मी वाढायची, कधीही अवकाळी पाऊस पडत नव्हता. पण मागच्या काही वर्षात हे चित्र पूर्ण पालटल आहे म्हणजे ना थंडी जाणवत ना पाऊस योग्य वेळेत पडत आणि अवकाळी पाऊस चालूच असतो कुठे ना कुठे.
मित्रांनो ह्या जागतिक तापमान वाढीला आपण जवाबदार आहोत, आपण प्लास्टिक पिशव्यानचा वापर आजही चालूच ठेवलाय, आपण जागोजागी कचरा करतोच आहोत, आजही आपण देवाचं निर्माल्य नंदीच्या पाण्यात टाकतो, आज chemical फॅक्टरी त्याची रसायने नंदीच्या पाण्यात सोडतात, आजही आपण ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करत नाही. आज आपली बिल्डर लॉबी झाडं तोडूज फ्लॅट सिस्टिम उभी करते आहे पण तेवढीच तत्परता झाड लावण्यात दाखवत नाही, सिमेंट कॉंक्रिट मुळे आपली ड्रेनेज सिस्टिम खराब झाली आहे आणि विशेष म्हणजे शहरात पाणी जमिनीत न मूरता सखोल भागात जाऊन तुंबायला लागलाय.
मित्रांनो जर आपल्याला मोकळा श्वास घायचा असेल तर आपल्याला वसुंधरेची काळजी घ्यावी लागेल, ती सुंदर आणि स्वच्छ ठेवावी लागेल, झाडांची जास्तीत जास्त लागवड करावी लागेल जेणेकरून आपल्याला आणि प्राणिमात्रांना oxygen मिळेल, नदी मध्ये निर्माल्य किंवा प्लास्टिक पिशव्या टाकू नये एवढी काळजी घ्यावी लागेल, तसेच प्लास्टिक पिशवीचा जराही वापर नाही करायचा ह्याची शपथ घ्यावि लागेल, निसर्गाचा वापर करायचा असेल तर निसर्गाची काळजी आपल्याला घायवीच लागेल. तर आपण सगळ्यांनी आपल्या ह्या सुंदर निसर्गाची काळजी घ्या आणि विशेष म्हणजे आपल्या मुलांना ह्याचा महत्व पटवून द्या म्हणजे ह्याचा जास्तीत जास्त प्रसार होईल. शेवटी एवढ नेहमी लक्षात ठेवा कि आपण वसुंधरेचे भाडेकरू आहोत आणि आपण जर तिची जागा स्वच्छ आणि टवटवीत नाही ठेवली तर ती रौद्ररूप धारण करेल जे आपल्याला परवडणारं नसेल. तुम्हाला मी 10 वर्षांपूर्वीची वसुंधरा आणि आताची वसुंधरा ह्याचा फोटो टाकतो आहे बघा काय करून ठेवलाय तिचा आपण.
मित्रांनो पटलं तर कृपया काळजी घ्यायला सुरुवात करा. जागतिक वसुंधरा दिवसाच्या शुभेच्छा!!
-स्वप्निल पातकर 22.04.2021

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...