मित्रांनो आज थोडंसं महिला दिनावर मत मांडतो.
8 मार्च जसजसा जवळ येतो तसतसा पेपर मीडिया, social मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सगळ्यांना महिलांची आठवण येते. पेपरचे रकाने महिलादिनानिमित्त वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी सवलतीने विकणाऱ्या दुकानदारांनी भरलेले असता, त्यात कमी कि काय मला एक sms आला कि महिलादिनानिमित्त सर्व महिलांचे रक्त तपासणी, mamography असे अनेक चेकअप 25% दारात केले जाईल. अशा अनेक जाहिराती तुम्ही सर्वजण महिलादिन येईपर्यंत तुमच्या आजूबाजूला पाहत असतीलच.
तर मित्रांनो सांगायचा मुद्दा हा आहे कि महिलांसाठी सुविधा किंवा त्या महिला आहेत म्हणून त्यांच्यासाठी सवलती फक्त महिलादिनीच का? इतर दिवशी देखील त्या महिला असतात ह्याचा ह्या जाहिरातदारांना विसर पडतो का? कि हा अट्टाहास फक्त त्या दिवशी आपला सेल कसा जास्त होईल ह्यासाठी असतो? खरंच काही प्रश्न नेहमीच अनुत्तरित असतात.
इलेक्ट्रॉनिक मीडिया तर महिलांसाठी किती कळवळा आहे म्हणून किती तरी कार्यक्रम घेऊन येतील, काहीजणी त्यात व्याख्याने देतील, तर महिलांनी कसा सक्षम होयला पाहिजे ह्याचे बाळकडू पाजतील. पण हेच इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हा महिलांवर अत्याचार होतात तेव्हा कुठे असतात, ठराविक महिला अत्याचार ज्यामध्ये एखादी सेलेब्रिटी इन्व्हॉल्व्ह असतो तेवढेच काय ते त्यांच्या वाहिनीवर दाखवणार, बरं त्याचा नियमित पाठपुरावा करून त्याला शिक्षा मिळेपर्यंत कधी बातम्या नाही दाखवत. एकदा कि चॅनेलचा TRP वाढला कि जास्त जाहिरातदार मिळणार ज्यामुळे चॅनेलचा इनकम वाढणार, एकदा पोट भरलं की बातमी बंद होते.
मला अस वाटते महिलादिन आजच्या काळात फक्त फॅशन म्हणून सेलीब्रेट केला जातो, आजच्या काळात सेलिब्रेशन हे फक्त सोसिअल मीडियावर दाखवण्यासाठी केले जाते. आज तुम्ही बघाल कि whatsapp, facebook आणि instagram ह्यासारखे social मीडिया प्लॅटफ़ॉर्म फक्त महिलादिनाच्या शुभेच्छा, जाहिराती आणि घरातल्या महिलांबरोबर सेल्फी ह्यांनी भरलेलं असणार. आजची तरुण पिढी ज्यादिवशी महिलांचं महत्व जाणतील त्यादिवशी खरं तर महिलादिन साजरा होईल.
आपला देश त्यातले बरेचसे प्रदेश आजपण महिला शोषण, महिलांवरील अत्याचार, मागासलेल्या महिला, निरक्षर महिला तसेच पंचायत सारख्या हुकूमशाही संस्था ज्या महिलांना आजपण खालच्या दर्जाची वागणूक देतात, हे ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस खरं म्हणजे आपण सगळ्यांनी महिलादिन फार गर्वाने साजरा केला पाहिजे. जास्तीत जास्त महिलांनी घराबरोबरच स्वतःच करिअर बद्दल देखील विचार केला पाहिजे, तुम्ही महिला ज्यांना तुमचे आईवडील पोटतिडकीने पैसे जमवून जे काही शिक्षण देतात आणि आपल्या पायावर उभे राहिला शिकवतात त्याचा कधी विसर पडू नका देऊ आणि नेहमी स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःची ओळख ही स्वतःच्या कर्तृत्वाने होऊ दे समाजात, मला असा वाटते तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला जास्त समाधान मिळेल.
आजच्या कॉम्पुटर आणि स्मार्ट फोनच्या दुनियेत जिथे तुमची मुलं स्मार्टनेस वापरून तुम्हाला फसवू शकतात त्यामुळे तुम्ही देखील स्वतः ह्याची प्राथमिक माहिती शिकून तुमच्या मुलांना काही प्रमाणात कंट्रोल करू शकता. आणि करिअर म्हणजे पैसे नाही, तर त्या पैस्याबरोबर तुम्हाला बाहेरच्या विविध लोकांचे विविध विचार (चागले/वाईट) शिकायला मिळतील आणि ते तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी देखील पडतील. तसेच स्वतःची सुरक्षा स्वतः करायला तुम्ही शिकल पाहिजे, संतांनी म्हंटल आहे "दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" त्यामुळे सगळ्याच गोष्टीत आत्मनिर्भर बना आणि यशाच्या शिखरावर पोहचा.
आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीत बऱ्याचदा अस म्हंटल जाते कि महिला मागे पडल्यात पण मला असं वाटते कि आज बऱ्याच क्षेत्रात महिलांनी पण प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांचा जास्त कौतुक, कालच वाचलं कि आपले st महामंडळ आता 50% चालक आणि वाहक म्हणून महिलांची भरती करणार आहेत, हे नवीन क्षेत्र आपल्या महिलांसाठी खरच स्वागत करण्यासारखा आहे, जास्तीत जास्त महिलांनी ह्याचा उपभोग घ्यावा.
तर मित्रानो आपण पुरुष म्हणून महिलांच्या करिअर मध्ये, तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यात मार्गदर्शन करून प्रोत्साहन करायला हवं. महिलादिनी एखादी साडी भेट देऊन किंवा एखादं महागडं गिफ्ट देऊन आपण मागे नाही हटू शकत. मित्रांनो आयुष्यात जे काही कराल ते स्वतःसाठी करा पण social मीडियासाठी नका करू कारण social मीडिया फक्त क्षणिक असत म्हणजे ज्या दिवशी likes यायचे थांबतात त्यादिवशी त्याचं महत्व कमी झालेलं असत, पण आत्मीयतेने केलेली गोष्ट दीर्घकाळ टिकते.
मी अाशा करतो माझी पोस्ट वाचून एक तरी महिला प्रेरित होईल आणि आयुष्यात काही तरी करण्यासाठी पुढे जाईल. ज्या दिवशी असं घडेल तो दिवस खऱ्या अर्थानी माझ्यासाठी सुंदर महिलादिन असेल. पण तूर्तास माझ्या सर्व महिला सहकार्यांना यशाच्या शिखरावर जाण्यासाठी शुभेच्छा आणि महिलादिन फक्त सवलतीमध्ये खर्च करण्यापुरती किंवा social media वर शुभेच्छा पाठवण्यासाठी लक्षात न ठेवता स्वतःला पुढे घेऊन जाण्यासाठी inspiration म्हणून लक्षात ठेवा.
नेहमीप्रमाणे मित्रानो हे माझं वयक्तिक मत आहे त्यामुळे पटलं तर इतरांना पाठवून प्रेरित करा नाही तर वाचून सोडून द्या. शेवटी सगळ्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहेच नाही का.
- स्वप्निल पातकर 08/03/2021